Slider Image
Slider Image
Slider Image
Slider Image
Slider Image
ताजी बातमी

गावाविषयी माहिती

सारोळे खुर्द   हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रभू श्री.राम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले  प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे.सारोळे खुर्द  गावात उत्तरमुखी हनुमान मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे सारोळे खुर्द ,सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २६०९  आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १, अंगणवाडी केंद्रे ३ व व्यायामशाळा १,सभामंडप-४  अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये सन २०१८  पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत सारोळे खुर्द ने खास ग्रामस्थांसाठी RO प्लांट बसविलेला असून गावातील १००% कुटुंब RO च्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच  गावात पुरातन शिव मंदिर असून , तसेच २१ मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून  द्राक्ष, कांदा, सोयाबीन व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. द्राक्ष , टोमॅटो , हिरवी मिरची ,कांदा या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच दुग्ध व्यवसाय करतातसारोळे खुर्द  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सारोळे खुर्द गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन पुरस्कुत तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत सन २०१६ -२०१७  पारितोषिक प्राप्त गाव बक्षीस रुपये-३ लक्ष रुपये  प्राप्त झाला होता .ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ८  सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

सारोळे खुर्द गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

सारोळे खुर्द हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १३  कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ ६०२ .७२ हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण ४८४  कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या २६०९  आहे. त्यामध्ये १३५४  पुरुष व १२५५  महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच गावाला वळसा घालून विनिता  नदी असून  गावातून ओझर खेड पाट जात असून रोटेशन मध्ये ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो . येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

सारोळे खुर्द गाव द्राक्ष, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो  उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्यामुळे जलसंधारणाची चांगली सोय आहे.

लोकजीवन

सारोळे खुर्द  गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून द्राक्ष, कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह  गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. यशवंती माता  यात्रा ,गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

सारोळे खुर्द च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

विशेष माहिती एकूण पुरुष स्त्री
एकूण लोकसंख्या २,६०९ १,३५४ १,२५५
लहान वयोगट (०–६ वर्ष) ३६४ १८२ १८२
अनुसूचित जाती (SC) २३८ १२२ ११६
अनुसूचित जमाती (ST) ८०७ ४२१ ३८६
साक्षर लोकसंख्या १,७७८ ९९८ ७८०
निरक्षर लोकसंख्या ८३१ ३५६ ४७५

संस्कृती व परंपरा

सारोळे खुर्द गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,महा शिवरात्र सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच गावात यशवंती माता  यात्रा हि अक्षय तृतीया ला मोठ्या उत्साहात ३ दिवस भरवली जाते त्यात प्रामुख्याने कावड रथ मिरवणूक हे आकर्षण आहे , गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व सप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे सारोळे खुर्द गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

  • ग्रामदैवताचे मंदिर – गावातील प्रमुख जागृत उत्तर मुखी मारुती मंदिर  गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
  • पुरातन शिव  मंदिर – गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे पुरातन काळातील मंदिर ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.
  • शेती क्षेत्र व द्राक्षबागा – सारोळे खुर्द द्राक्ष व भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हिरवीगार शेते, द्राक्षबाग शेती पाहण्याजोगी आहे.

जवळची गावे

सारोळे खुर्द गाव  निफाड तालुक्याच्या उत्तरेला असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे सारोळे खुर्दशी सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

सावरगाव , रानवड , ब्राम्हणगाव , वनसगाव , खानगाव , खडक माळेगाव , आसपासची प्रमुख गावे आहेत.

ग्रामपंचायत प्रशासन


अ क्र नाव पद मोबाईल नं
सौ. वर्षा सुभाष गव्हाणे प्रशासक ९५५२४२१११४

लोकसंख्या आकडेवारी


४८४
२६०९
१३५४
१२५५
Logo 1
Logo 2
Logo 3
Logo 4
Logo 5
Logo 6